पंढरपूर: सततच्या पावसामुळे तपकिरी शेटफळ गावाचा संपर्क तुटला; शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोहोळ तालुक्यातील तपकिरी शेटफळ गावाचा संपूर्ण संपर्क तुटला आहे. गावातील ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूल पाण्याखाली गेला असून नागरिकांना दळणवळण करणे अशक्य झाले आहे. गावातील रस्त्यावरील ओढ्यावर पाणी असल्याने शाळकरी मुले जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधत त्वरित उपयोजना करण्याची मागणी केली आहे.