हिंगणघाट: शहरात भव्य निषेध मोर्चा :सरन्यायाधीशांवरील हल्ला, सोनम वांगचुक अटक आणि जातीगत जनगणना विलंबाचा निषेध
हिंगणघाट:सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा, प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणसुधारक , सोनम वांगचुक यांच्या अटकेचा आणि जातीगत जनगणनेला होत असलेल्या विलंबाचा निषेध नोंदवण्यासाठी शहरात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चा ओबीसी संघर्ष समिती तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आला.मोर्चाची सुरुवात नंदोरी चौकातून झाली असून तहसिल कार्यालयावर संपन्न झाला.मोर्चात विविध पक्षांचे विविध पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते