मुर्तीजापूर: सिरसो येथील आमदार हरीष पिंपळे यांच्या शेतात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
मंत्री दर्जा प्राप्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आमदार हरीष पिंपळे यांच्या सिरसो येथील शेतात सदिच्छा भेट दिली असता सर्वप्रथम आमदार हरीष पिंपळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर त्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात बांबू लागवडीचे महत्त्व त्यांचे आर्थिक फायदे तसेच शासनाने दिलेल्या सबसिडीबाबत सविस्तर माहिती देत पुढची पिढी वाचवायची असेल तर वृक्ष लागवड करा असे आवाहान केले यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.