शिरपूर: अमीत बघेल यांच्या वक्तव्याविरोधात सिंधी समाजाचा संतप्त,शिरपूर तहसीलदार व शहर पोलीस ठाण्यात दिले निवेदन सादर
Shirpur, Dhule | Nov 7, 2025 सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल आणि अग्रसेन महाराज यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या जोहार छत्तीसगड पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांच्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर येथील सिंधी समाजातर्फे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता तहसीलदार महेंद्र माळी आणि शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना निवेदन देऊन बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.