सिंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 1 हा अनुसूचित जमाती (महिला) राखीव असल्याने, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा राजेश उईके यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. परंतु, त्यांचे नाव मतदार यादीतून हेतुपुरस्सर वगळल्याचा गंभीर आरोप उईके कुटुंबीयांनी केला आहे. दि. 8 डिसेंबर सोमवारी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा तसेच उपआयुक्त (नगरपरिषद विभाग) यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित प्रभागातील निवडणूक स्थगित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.