आज रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास उरण, जिल्हा रायगड येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भावना घाणेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. ५ व ७ मधील मतदारांशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भेट घेऊन थेट संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष मनाली भिल्लारे, पनवेल युवक अध्यक्ष शहाबाज पटेल, रायगड युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, प्रदेश महीला सचिव वंदना राजपुत, युवती अध्यक्ष कावेरी जायभाये व प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.