साताऱ्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी दिले आहे. राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे असही त्यांनी सांगितलं. ते आज दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.