मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी आवश्यक असलेली रेती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. घरकुल योजनेंतर्गत रेती ही अत्यावश्यक बांधकाम सामग्री असताना सध्या ती मिळविण्यात मोठ्या अडचणी येत असल्याने घरकुल बांधकाम रखडले असून अनेक लाभार्थ्यांचे काम थांबले आहे.