रावेर: रावेर तालुक्यातील जुने अजनाड या गावात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या, रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Dec 14, 2025 रावेर तालुक्यात जुने अजनाड हे गाव आहे. या गावातील रहिवाशी आत्माराम बळीराम बेलदार वय ७५ या वृद्ध इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.