भंडारा नगरपरिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या कथित गैरप्रकार आणि गोंधळाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजता दरम्यान भंडाऱ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या आंदोलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंदोलकांनी चक्क ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निवडणूक प्रक्रियेचा तीव्र निषेध नोंदवला. प्रभाग क्रमांक ३ (अ) मधील उमेदवार करुणा राऊत यांचे नाव आणि चिन्ह मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममधून गायब झाल्याने निवडणूक पारदर्शकतेव