सेलू: सेलू शहरातील एका प्रभागात महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Oct 14, 2025 सेलू शहरातील एका प्रभागात रात्रीच्या सुमारास घरात घुसून एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती ता. 14मंगळवारला सेलू पोलिसांनी दिली.