कन्नड: शिवराई येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याची अतिवृष्टी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
आज दि १० नोव्हेंबर रोजी सांयकाळी सात वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली कि कन्नड तालुक्यातील शिवराई गावातील भाऊसाहेब कचरू शिनगारे (वय ६२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिनगारे यांच्याकडे शिवराई शिवारातील गट क्रमांक ५५ मध्ये तीन एकर शेती असून, ते शेतीसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले.