मुखेड: शहरातील व्यंकटेश नगर येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; मुखेड पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद.
Mukhed, Nanded | Apr 23, 2024 मुखेड शहरातील व्यंकटेश नगर येथील युवक सुशील श्यामराव जोंधळे वय २८ वर्ष राहणार व्यंकटेश नगर येथेअ राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २२ एप्रिल रोजी सकाळी निदर्शनास आली याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. सुशील जोंधळे या युवकाने घरातील पंख्याला साडीच्या पदराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समजले आहे. उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. डॉ. लक्ष्मीकांत पेंडकर यांनी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केले आहे. सदर घटनेचा प