*कुष्ठरोग राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित*
73 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 15, 2025 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी असाधारण राजपत्र जारी करून कुष्ठरोग या आजाराला राज्यात ‘अधिसूचित आजार’ (Notifiable Disease) म्हणून घोषित केले आहे. साथरोग अधिनियम, १८९७ नुसार हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी घेण्यात आला आहे. प्रमुख निर्देश आणि अहवाल सादर करण्याची आवश्यकता कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून, जर त्याचे लवकर निदान झाले नाही आणि उपचार केले नाहीत तर, त्यामुळे शारीरिक व्यंग, विकलांगताव लक्षणीय आजार होऊ शकतात.