महाड: उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयात दि.18 सप्टेंबर रोजी रस्ता अदालतीचे आयोजन
Mahad, Raigad | Sep 16, 2025 उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात गुरुवार 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता रस्ता अदालत आयोजित करण्यात आली आहे. या रस्ता अदालतीमध्ये अलिबाग, मुरुड तालुक्यातील या न्यायालयातील संबंधित सर्व मान्यवर विधिज्ञ, संबंधित पक्षकारांनी रस्त्यांविषयक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे असल्याने सदर दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या सुनावणीकामी संबंधित लेखी म्हणणे न चुकता सादर करावे. असे आवाहन आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी दिली.