कोपरगाव: तालुक्यातील वारी व कानेगाव येथे आ.काळेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न, पुलाच्या कामाची पाहणी
कोपरगाव वारी येथे 64.50 लक्ष रुपये निधीतून श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच चोंढी नाल्यातील पाण्याचे जलपूजन आज ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा.आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.तसेच कान्हेगाव येथे ५० लक्ष रुपये निधीतून पूर्ण झालेल्या श्री नरहरी (नृसिंह) देवस्थान परिसराच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी वारी येथील गोदावरी नदीवरील सुरु असलेल्या पुलाच्या कामाची आ.काळेंनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.