सेलू: हिंगणी परिसरातील दारूचे अड्डे बंद करा; नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी,
पोलिसांच्या निष्क्रियतेने नागरिकांत संताप
Seloo, Wardha | Nov 8, 2025 हिंगणी परिसरातील जंगलांमध्ये अवैध गावठी मोहा दारूचा व्यवसाय धडाक्यात सुरू असून, पोलिस मात्र मुकदर्शक बनले आहेत. दिवसाढवळ्या उठणारे धुरांडे आणि चालू असलेल्या भट्ट्या पाहूनही पोलिसांची निष्क्रियता नागरिकांना संताप आणणारी ठरत आहे. स्थानिक पातळीवर या व्यवसायाला राजकीय तसेच पोलिसांचे संरक्षण असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दारूच्या या "पंढरीत" पांढरी विषारी दारू जीवितास धोका ठरत आहे. या दारूचा तत्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी ता. ८ शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली