सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीसठाण्याचा हद्दीतील ग्राम बाम्हणी खडकी शेत शिवारात दि.२० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वाघाच्या पायाचे ठसे शेतात आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे बामणी खडकी हे गाव रेंगेपार वनपरिक्षेत्र अंतर्गत येते बामणी खडकी या शेतशिवारालगत जंगल आहे अशातच बामणी खडकी येथील शेतकरी वामन गजभिये यांच्या शेतात वाघाच्या पंजाचे ठसे आढळले या शेतकऱ्यांनी याची माहिती दिली स्वतः वामन गजभीये यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांना वाघाच्या पायाचे ठसे आढळले