महाराष्ट्र राज्य सुवर्णकार सेनेच्या वतीने आयोजित १० वा 'ऋणानुबंध' वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवारी, १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहरातील आदित्य लॉन्स येथे अत्यंत उत्साहात पार पडला. सुवर्णकार समाजातील उपवर तरुण-तरुणींना योग्य जोडीदार मिळावा आणि समाजाचे संघटन अधिक बळकट व्हावे, या उद्देशाने या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.