कार व दुचाकीची धडक होत अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास गंगापूर महामार्गावर चोरवाघलगाव शिवारात घडली,मितेश विजय गांगुर्डे वय 24 वर्षे राहणार मालेगाव असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मितेश हा गंगापूर महामार्गाने जात असताना कार दुचाकीला धडकली या अपघातात तो गंभीर जखमी झाला उपस्थितांनी त्याला तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास दाखल केले.