धुळे: मनपा निवडणुकीचे रणशिंग राष्ट्रवादी भवनातून फुंकले! शरद पवार गट महाविकास आघाडीसह मैदानात उतरणार
Dhule, Dhule | Nov 1, 2025 धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने रणशिंग फुंकले आहे. जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निष्ठावंत, तरुण आणि महिला उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त झाला. प्रभागनिहाय आढावा घेऊन इच्छुकांना जनसंपर्क वाढवण्याचे निर्देश देण्यात आले असून, कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले आहे.