चामोर्शी: अहेरी उपजिल्हा रुग्णालयात ' पितृमोक्ष ' अमावशेनिमित्त भोजनदान
अहेरी: पितृमोक्ष अमावस्येच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी भोजनदानाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. समाजातील गरजू आणि आजारी व्यक्तींना आधार देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रुग्णांना पौष्टिक आणि चविष्ट भोजन देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. या उपक्रमामागे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. याप्रसंगी ग