दिवाळीनंतर बाजार समितीमध्ये पुन्हा व्यवहार सुरू होताच कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार दि. 27 ऑक्टो. रोजी सोयाबीनची विक्रमी आवक झाली. पहाटेपासूनच बाजार परिसरात ट्रॅक्टर आणि इतर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दिवस अखेर तब्बल 14 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी आवक मानली जात आहे. मात्र आवक वाढल्यामुळे दरात घट झाली असून सोमवारी सोयाबीनला सरासरी 3600 ते 4440 रुपये एवढा प्रति क्विंटल दर मिळाला जो शासकीय हमीभावापेक्षा तब्बल 1 हजा