दिंडोरी तालुक्यातील पालखेड;लोखंडेवाडी;जोपूळ; पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करत नुकसान भरपाई देण्याची एकमुखी मागणी केली आहे. पिंपळगाव मार्केट ते त्रंबकेश्वर व्हाया दिंडोरी उमराळे हा रस्ता सिहंस्थ निधीतून होत असून राष्ट्रीय महामार्ग ने त्रंबक जाणाऱ्या भाविकांसाठी हा बायपास बनविण्यात येणार आहे .