कोरेगाव तालुक्यातील रेवडी येथील पारधी कुटुंबावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्यांच्या विरोधात समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ डिसेंबरपासून उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देणारे निवेदन आज गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.या निवेदनात पूजा काळे यांनी सांगितले की, जत्रेतील खेळण्याच्या साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती.