उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
9k views | Yavatmal, Maharashtra | Mar 10, 2025 यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघराज पुराम यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख वैद्यकीय अधीक्षक डॉ. सातुरवार मॅडम उपजिल्हा रुग्णालय पांढरकडा यांचे उपस्थितीत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण 10 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 6 रुग्ण शस्त्रक्रिया करिता पात्र ठरले त्यामध्ये 3 रुग्ण हे अंडवृद्धीचे तर 3 रुग्ण हे हर्नियाचे होते सर्व पात्र रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.