शहापूर: शहापूरचे आ. दौलत दरोडा यांच्या माणसांनी हल्ला केला, समाजसेवक राहुल कठोले यांनी केला आरोप
Shahapur, Thane | Jul 10, 2025 शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या माणसांकडून आमचे सहकारी राजेश भावार्थे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असा आरोप ठाण्यातील समाजसेवक राहुल कठोले यांनी आज दिनांक १० जुलै रोजी रात्री १२ च्या सुमारास केला आहे. राजेश भावार्थे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी कठोले यांनी माहिती दिली. भ्रष्टाचार उघड केला म्हणून भावार्थे यांच्यावर हल्ला झाला असल्याचं त्यांचे दुसरे सहकारी महेश हरणे यांनी सांगितले.