नांदुरा: शहरातील अतिक्रमण धारक घरकुला पासून वंचित; सर्वेक्षण करण्याची मागणी
नांदुरा शहरातील भीम नगर खैवाडी,अंबानगर, शिवराज नगर, रामनगर, सोफी बाग या भागात गेल्या साठ वर्षापासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. नगरपरिषद ने ठरवून दिल्याप्रमाणे येथील सर्व रहिवाशी विविध शासकीय करांचा भरणा नियमितपणे करीत आहेत.परंतु अजून सुद्धा येथील नागरिकांना रमाई घरकुल योजना वगळता इतर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही भारत सरकारच्या धोरणानुसार प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्याचे उद्दिष्ट आहे.परंतु यापासून हे अतिक्रमण धारक पूर्णता वंचित आहेत .