बुलढाणा: कोथळी शिवारात जिवंत तारच्या करंटने दोन म्हशी दगावल्या तर शेतकरी जखमी,जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
मोताळा तालुक्यातील अनेक भागात काल वादळ वाऱ्यासह पाऊस पडल्याने कोथळी शिवारात शेतातील विद्युत लाईनची जिवंत तार तुटल्याने करंट पसरल्याने दोन म्हशी दगावल्या असून एक शेतकरी जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. जखमी शेतकऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.