अर्जुनी मोरगाव: तुमसर येथे अखिल भारतीय कवी संमेलन व 'बिखरे से एहसास' या काव्य संग्रहाच्या विमोचन कार्यक्रमाला आ. बडोले यांची उपस्थिती
श्री अग्रसेन भवन तुमसर जि.भंडारा येथे तुमसर साहीत्य मंचच्या वतीने आयोजित अखिल भारतीय कवी संमेलन व कवी सतिशजी साहु यांच्या 'बिखरे से एहसास' या काव्य संग्रहाच्या विमोचन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री.प्रदीपजी पडोळे, सुप्रसिद्ध साहित्यकार प्रमोदजी गवरु,दैनिक उत्कल मेलचे संयुक्त संपादक व साहित्यकार डॉ.सुशीलजी दाहिमा अभय आदी मान्यवर उपस्थित होते