खुलताबाद: खुलताबाद नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत चुरस!६ इच्छूकांची मुलाखत पार, नगरसेवकपदासाठी तब्बल ६३ जणांची धाव
खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी रंगल्या. नगराध्यक्षपदासाठी तब्बल ६ तर नगरसेवकपदासाठी ६३ जणांनी हजेरी लावली. सर्वसाधारण जागा सुटल्याने नगराध्यक्षपदावर चुरस निर्माण झाली आहे. या मुलाखती तालुकाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. हाजी अकबर बेग, अँड. कैसरोद्दीन, अयाज बेग, मुनीबोद्दीन, शेख वाजेद, गजानन फुलारे हे नगराध्यक्षपदाचे इच्छूक उमेदवार आहेत