मानगाव: दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त लोणेरे येथे `रन ऑफ इंटिग्रिटी’ मॅरेथॉनचे आयोजन..@raigadnews24
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “रन ऑफ इंटिग्रिटी” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.