गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने दगड, लाठ्या आणि काठ्यांनी तरुणावर अमानुष असा प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना भोकरदन नाका पोलीस चौकीजवळ बुधवार दि. 10 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघा भावंडांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. गाडीला कट लागल्यामुळे सुरू झालेले वाद हाणामारीत झाला.