तालुक्यातील पांगरबावडीजवळ दुचाकी आणि चारचाकीचा अपघात
Beed, Beed | Oct 23, 2025 बीड तालुक्यातील पांगरबावडीजवळ आज गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या धडकेत कार चालकही जखमी झाला आहे. MH 42 AX 2501 क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराच्या कंपाऊंड गेटवर जाऊन आदळली. त्यामुळे गेट आणि भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदतक