नरखेड: वीस वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य, कोंढाळी नगरपंचायत बनताच निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे दावेदार, परंतु मतदार यादीतून नाव गायब
Narkhed, Nagpur | Oct 20, 2025 कोंढाळी ग्रामपंचायत मध्ये वीस वर्ष संजय राऊत हे सदस्य होते. आता कोंढाळी ग्रामपंचायत ही नगरपंचायत बनली असल्याने यावर्षी प्रथमच तेथे नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सक्रिय असलेले संजय राऊत हे दावेदार असल्याची चर्चा होती परंतु त्यांनी मतदार यादी चाळून बघितली असता त्यांचे नाव असते ते आढळले नाही. त्यांचे नाव चक्क हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी मतदार यादीत आढळले आहे.