आष्टी: शेता सभोवताल विद्युत प्रवाहाचा करंट.. युवकाचा झाला मृत्यू पारडी येथील घटना दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केला दाखल..
Ashti, Wardha | Oct 27, 2025 पारडी गावाजवळील शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहमुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २५ तारखेला 22 ते दिनांक 26 तारखेला साडेसहाच्या दरम्यान घडली.. दिलेल्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी 26 तारखेला 14 वाजून 15 मिनिटांनी या घटनेची नोंद केली असून दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नितीन उत्तम देहारे वय 26 वर्ष राहणार पारडी असे मृत युवकाचे नाव आहे.. अरुण भगुलकर मंगेश अरुण भगुलकर दोन्ही राहणार पारडी हेटी तालुका कारंजा असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले