भंडारा जिल्ह्यात निवडणुकांचा माहोल रंगताना राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांनी प्रचाराचा जोर सुरू केला असून भंडारा नगराध्यक्ष पदाकरिता शिवसेना (शिंदे गट) कडून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आमदार भोंडेकर स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरल्याने शिवसेना शिंदे गटात चैतन्य निर्माण झाले आहे. आमदार भोंडेकर म्हणाले की, “प्रचाराचा श्रीगणेशा अद्याप झालेला नाही. सध्या आम्ही नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहोत.