यवतमाळ: बेलोरा येथे एकास लोखंडी विळ्याने मारहाण,आरोपी विरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी संतोष शिवलाल आडे यांच्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरला साडेअकरा वाजताच्या सुमारास बेलोरा येथे आरोपी विनोद वामन मेश्राम याने फिर्यादीचा लहान भाऊ सचिन आडे याला काल तू मला शिवीगाळ का केली असे म्हणून फिर्यादीच्या लहान भावास जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी विळ्या ने मारहाण करून गंभीर जखमी केले.या प्रकरणी 21 ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास यवतमाळ ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.