संगमनेर: गरम पाण्यामुळे आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू; खळी कांगणवाडीमध्ये शोककळा
गरम पाण्यामुळे आजी-नातवाचा दुर्दैवी मृत्यू; खळी कांगणवाडीमध्ये शोककळा संगमनेर तालुक्यातील आश्वी जवळील खळी कांगणवाडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गरम पाणी अंगावर पडून भाजल्याने आजी व तिच्या पाच वर्षांच्या नातवाचा मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खळी कांगणवाडी येथील रहिवासी सिंधुबाई नामदेव सोसे (वय ५२) व त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे (वय ५) हे आंघोळीसाठी गरम पाणी वापरत असताना अनवधानाने पाणी त्यांच्या अंगावर सांडले.