पवनी: पवनी पोलिसांची अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई : ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल कोरंभी रोडवर जप्त
Pauni, Bhandara | Sep 15, 2025 १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास पवनी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्याची कारवाई केली. ही कारवाई मौजा कोरंभी रोडवरील पंचभाई राईस मिलजवळ करण्यात आली. पोलिस गस्तीदरम्यान एक ट्रॅक्टर संशयितरीत्या जाताना दिसून आला. तपासणी केली असता, ट्रॉलीमध्ये वाळू भरलेली आढळली. मात्र वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना चालकाकडे नव्हता. विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, ट्रॉली किंम व त्यामध्ये भरलेली वाळू सुमारे ६ हजार रुपये असा ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.