अकोट: बस स्थानक मार्गावरील मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये वाद..? तात्काळ पोलीस दाखल; व्हिडिओ सोशल मीडियात वायरल
Akot, Akola | Dec 2, 2025 बस स्थानक मार्गावरील मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना मतदानाच्या दिवशी दुपारच्या सुमारास घडली दरम्यान बस स्थानक मार्गावरील भर वर्दळीच्या रस्त्यावर दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान या प्रकारामुळे काही काळ या मतदान केंद्रा जवळ गोंधळाची परिस्थिती होती मात्र पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळली या मतदान केंद्राबाहेर झालेल्या गोंधळामुळे मात्र शहरात काही काळ उलट सुलट चर्चा रंगली होती.