चाळीसगाव: खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांची जादा भाडे घेऊन होणारी लूट थांबवा - रयत सेनेची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी - चाळीसगाव ते पुणे जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्स चाळीसगाव येथून मोठ्या प्रमाणावर जात असतात त्या खाजगी ट्रॅव्हल्स वाहनातून प्रवासी वाहतूक केली जाते, ट्रॅव्हल्स मालकांना प्रवास भाडे एसटी च्या दराने शासनाने निश्चित केले असताना सदर ट्रॅव्हल्स चालक, मालक प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहे ती लूट थांबवावी