नेवासा: गाव कडकडीत बंद ठेवून ; व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांचा भव्य मोर्चा
सोनई येथे १९ ऑक्टोबर रोजी मारहाणीची घटना घडली होती.या घटनेतील दाखल असलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्या संदर्भात सोनईगावतील व्यापारी व ग्रामस्थ यांच्यावतीने सोनईत दुपारपर्यंत कडकीत बंद ठेऊन सोनई पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा मध्ये सोनईतील व्यापारी वर्ग, महिला,तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.