अलिबाग: रखडलेल्या रस्त्यांबाबत भाजप नेते पंडित पाटील संतापले
मंत्र्यानो हेलिकॉप्टरने न येता रस्त्याने प्रवास करा
घरचा आहेर
Alibag, Raigad | Nov 26, 2025 रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या प्रकल्पांवर माजी आमदार भाजप नेते पंडित पाटील यांनी आपली थेट सरकारवर नाराजगी व्यक्त केलीय. अलिबाग वडखळ मार्ग आणि अलिबाग मांडवा या रस्त्यावर होणारी सततची वाहतूक कोंडी आणि अपुरे अरुंद रस्ते यामुळे अलिबाग करांना गेली कित्यके वर्ष नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे अलिबागकरांची कोंडी होत आहे. दुसरीकडे अलिबाग विरार कॉरिडॉर मार्ग, आणि अलिबाग वडखळ मार्ग रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमच्या कामाकडे दुर्लक्ष केले.