शिरपूर: पळासनेर शिवारात दोन दुचाकींचा भीषण अपघात : तीन जण जखमी
Shirpur, Dhule | Sep 19, 2025 तालुक्यातील पळासनेर शिवारात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिलट बाबा परिसरात 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सुमैया युनूस कुरेशी 31, फातिमा युनूस कुरेशी 14 महिने रा.खरगोन आणि कौलास भिका चव्हाण 42 रा. सबगव्हांन पारोळा हे गंभीर जखमी झाले आहेत.पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.