नागपूर ग्रामीण: पारधी बेडा येथे पोलिसांची धाड, मोह फुलाची दारू केली जप्त
एकोणवीस ऑक्टोबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अंतर्गत असोला, पारधी बेडा या ठिकाणी पोलिसांनी धाड कारवाई करून तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिथून गावठी मोह फुलाची दारू किंमत 98 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध पुण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.