हिंगणघाट: गिरड परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा: आमदार कुणावार यांची वनमंत्र्यांच्याकडे फोन वरून मागणी
समुद्रपूर: गिरड खुर्सापार परीसरात एक वाघ आणि एक वाघीण तिचे तिनं बच्छडे अश्या ५ वांघानी गेल्या पाच ते सहा महिन्यापासुन शेतीशिरात मुक्त संचार सुरू केल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे.यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी १३ सप्टेंबरपासून मिळाली आहे.या वाघाच्या मार्गावर वनविभागाचे कर्मचारी असून तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.