पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनानुसार आचारसंहितेचे कडक पालन होईल याची खबरदारी घेतली जात आहे. निवडणूक आचारसंहितेमध्ये येणाऱ्या सार्वजनिक सणामधील आचरणाबाबत राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे विहित केलेली आहेत. राजकीय पक्षाचे नेते उमेदवार / कार्यकर्ते सण / उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. तथापि या सण / उत्सवाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांनी अथवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये अथवा त्यासाठी कुठल्याही सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये भोजनावळी / जेवणाचे कार्यक्रमाचे आयोजन करू नये.