कळमेश्वर: कळमेश्वर येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांचा आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते सत्कार
आज माझ्या निवासस्थानी नागपूर जिल्ह्यातील सावनेर, कळमेश्वर, खापा, मोवाड व कोंढाळी येथील सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी मलिकार्जुन रेड्डी, माजी आमदार,डॉ. राजीव पोतदार, प्रदेश कार्यकारणी सदस्य,मनोहर कुंभारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष,अशोक धोटे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवत विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकहिताचे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली