चंद्रपूर: कर्जमाफीचे आश्वासन फोल बल्लारपुरात शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी
चंद्रपूर 22 ऑक्टोंबर रोज दुपारी बारा वाजता च्या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज बल्लारपूर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत अनोखा निषेध नोंदविला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत रक्कम न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या बांधांवर भाकर पिठलं आणि ठेचा खाऊन सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली यात अनेक शेतकरी सहभागी झाले